!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस सतरावा १६ जुलै)
आमचा कालचा मुक्काम वाखरीनजिक गणेश पाटील यांच्या वडाच्या वस्तीवर होता. आज पालखी उशिरा मार्गस्थ होणार असल्याने आम्ही थोडं निवांतच होतो. काल रात्री पाऊस पडल्याने वारकऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. आज सकाळी छानपैकी सत्संग झाला. आज दुपारी अडीच वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. सुरुवातीचा काही काळ पालखी सोहळ्यात चालणे झाले. नंतर मात्र एकाएका जागेवर अर्धा तास, एक तास थांबावे लागे.
आमच्या पुढे संत तुकाराम महाराजांची पालखी होती. वाखरी ते पंढरपूर हे अंतर केवळ पाच किलोमीटर असून ते पार करण्यासाठी लागणारा वेळ मात्र आठ, नऊ तासांचा होता. प्रत्येक दिंडी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात व्यस्त होत्या. हे खेळ पाहणे, विविध पालख्यांची दर्शन घेणे यासाठी दुतर्फा गर्दी होती.
आज रथ ओढण्याचा मान पंढरपूर येथील वडार समाजाला आहे. पंढरपूर येथील अनेक लोक माउलींना आणण्यासाठी वाखरीच्या दिशेने जातात.विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकरी बेभान होऊन नाचत असल्याचे सर्वत्र दिसून येत होते. प्रत्येक पालखी चंद्रभागेला येतेच. तेथे आरती होते. माऊलींच्या मंदिरात आरती होते. दिंडी चालकांच्या घरीदेखील आरती होते.मगच वारीची सांगता होते.
या वेळची वारी सफल होण्यामध्ये दिलीप चव्हाण, गोरख चव्हाण, ज्ञानेश्वर सावंत, सुधाकर अमृतकर, शिरीष देशमुख, सी.बी. पवार आदि मंडळींचा वाटा आहे. पुन्हा पुन्हा वारी घडावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा