वयाच्या ६५ व्या वर्षी प्रोकॅम स्लॅम मुंबई - बेंगलुरु - दिल्ली- कोलकत्ता यशस्वीरित्या पूर्ण
मी मे २०१७ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो. निवृत्तीनंतर उद्योजक श्रीकांत पवार यांच्या प्रेरणेने सेवा निवृत्तीनंतर मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.प्रथमत सातारा हील मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात दोन तास तेरा मिनिटात ही अवघड स्पर्धा पूर्ण केली. मी या स्पर्धेपूर्वी कोठेही भाग घेतला नव्हता. नंतर मात्र मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊ लागलो. बऱ्याच स्पर्धात मी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले.
मी १० किलोमीटरपासून १०० किलोमीटर स्पर्धेत भाग घेतला. सातारा येथील धावपटू अनिल माने यांच्यामुळे प्रोकॅम स्लॅममध्ये भाग घेतला. या प्रोकॅम स्लॅममध्ये सन २०२३ मध्ये भाग घेतला. प्रथम मी १५ जानेवारी २०२३ ला टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर मध्ये भाग घेतला. ही स्पर्धा ४:३३:५८ (चार तास तेहतीस मिनिटे व अट्टावन सेकंदात) पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड रनसाठी पात्र ठरलो. टीसीएस १० के बेंगलुरु ही स्पर्धा २१ मे २०२३ रोजी ( १० किलोमीटरची )स्पर्धा झाली. ही स्पर्धा ५० :२६ ( पन्नास मिनिटे सव्वीस सेकंदात ) पूर्ण केली. दिल्ली येथे १६ ऑक्टोबर २०२३ वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. ही स्पर्धा १:४९:४२ ( एक तास एकोन पन्नास मिनिटे आणि बेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. टाटा स्टील कोलकत्ता ही पंचवीस किलोमीटरची स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी कोलकत्ता येथे झाली मी ही स्पर्धा २:२१:१७ ( दोन तास एकवीस मिनिटे सतरा सेकंदात ) पूर्ण केली.
या चारही स्पर्धा मी एका वर्षात पूर्ण केल्या. सातारा येथील सात आठ लोकांनी प्रोकॅम पूर्ण केल्याबद्दल वृत्तपत्रांनी देखील आम्हाला चांगलीच प्रसिध्दी दिली. प्रो कॅम पूर्ण केल्याबद्दल संयोजकाच्या वतीने आज मला गिफ्ट मिळाले. गिफ्टमध्ये चारही स्पर्धेतील आमचे धावतानाचे फोटो, कॅप, टी शर्ट आदि साहित्य मिळाले.
आपण सातत्यपूर्ण सराव केला तर अशा स्पर्धेत भाग घेऊ शकतो तो आपण घ्यावा असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा