!! कास अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये विशाल घोरपडे द्वितीय !! (३० एप्रिल )
आज ३० एप्रिल, या शुभदिनी कास अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० व ६५ किलोमीटर असे स्पर्धा प्रकार होते. माझे स्नेही मंगळापुरचे विशाल घोरपडे यांनी ५० किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. त्यांनी ही स्पर्धा ४:२६ चार तास सव्वीस मिनिटात पूर्ण केली.
या स्पर्धेत बहुतांशी कॉम्रेड रनरनी भाग घेतला होता. सगळे स्पर्धक एकसे बढकर एक होते. मी आणि विशालनी बऱ्याचवेळा एकत्र सराव केला आहे. या सरावाचा निश्चितच फायदा झालेला आहे. आजचे यश हा सत्संगाचा फायदा आहे असे मला वाटते.
या मरेथॉनमध्ये मी प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता मात्र स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यानंतर स्वस्थ राहावे असे वाटत नाही म्हणून मी ११ किलोमीटरसाठी बरोबर धावलो. या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक आले होते. चैतन्यदायी आरोग्यासाठी प्रत्येकाने धावण्यासारखा व्यायाम करावा असे मला वाटते. विशाल घोरपडे यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा