रविवार, ९ एप्रिल, २०२३

!! रन फॉर होमिओपॅथी !! (९ एप्रिल ) एक्कावन वर्षांपुढील कॅटेगरीत दुसरा क्रमांक

 !! रन फॉर होमिओपॅथी !! (९ एप्रिल )  

      आज सातारा येथे रन फॉर होमिओपॅथीचे आयोजन करण्यात आले होते. होमिओपॅथी उपचार पध्दतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच ही मॅरेथॉन आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सातारा येथे डॉ. हनिमन होमिओपॅथीक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची नव्याने स्थापना झाली आहे. सन १७९६ साली होमिओपॅथी या शास्त्राची निर्मिती डॉ. सॅम्युएल हनीमन यांनी केली. त्यांच्या नावानेच सदरच्या हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे.सध्या होमिओपॅथी या शास्त्रप्रणालीचा अनेक डॉक्टर्स शास्त्रशुध्द अभ्यास करु लागले आहेत. डॉ. हेरिंग हे त्याकाळातील निष्णात सर्जन होते.तेच  होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.

   आता आजच्या स्पर्धेविषयी.....

           आज  सातारा येथे ३ कि. मी.व १० कि.मी.च्या मरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. मी १० कि. मी. रनिंगमध्ये भाग घेतला होता.आज मी ही स्पर्धा ००: ४९:०४ (एकोनपन्नास मिनिटे आणि चार सेकंदात) पूर्ण केले.



               एक्कावन  वर्षांपुढील कॅटेगरीत  माझा दुसरा क्रमांक आला. डॉ. सुधीर पवार,  स्वास्थ्यम फिटनेसचे डॉ. दयानंद घाडगे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आले.



           आजची स्पर्धा सकाळी ६:१५ वाजता या स्पर्धेचे ब्रँड अंबासिडर डॉ. सुधीर पवार, डॉ. जवाहरलाल शहा यांच्या फ्लॅग ऑफने झाली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी "जनगणमन' हे राष्ट्रगीत झाले. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तिमय झाले होते. स्पर्धेचा  प्रारंभ शाहू स्टेडियम येथून झाला. स्पर्धेचा मार्ग करंजे,कोंडवे, हमदाबाज आणि परत शाहू स्टेडियम असा होता.



 आज रुट सपोर्टसाठी आमच्या सौ. कुसुमताई पवार पहिल्यांदाच आल्या होत्या. धावत असताना विशाल स्पिरिट नेहमीच प्रेरणा देत असते. माझी दैनंदिन प्रगती विशाल स्पिरिटमुळे होत आहे. आजच्या यशाचे श्रेय विशाल घोरपडे आणि सौ. कुसुम पवार यांनाच द्यायला हवे.



      आपणही शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करावा. खेळामुळे आपणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तीच आपणास प्रगती पथाकडे नेत असते. चला तर आपणही नियमित व्यायाम करुया आणि आपली प्रगती साधुया.



        राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...