गुरुवार, २३ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तिसरा २३ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तिसरा २३ जून )

           आळंदी ते पुणे  हा टप्पा मोठा असल्याने आज विश्रांतीचा दिवस आहे. मोठा टप्पा असलाकी किमान एखादा दिवस विश्रांती असते. कालचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १६ तासाचा कालावधी गेला. वारीत अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. ज्या गोष्टी समाजापर्यंत नेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात ते येथे सहज होतात, एकाचवेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाता येते. उदाहरण द्यायचे झाले तर आरोग्यवारीचे देता येईल. 'वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची'या संकल्पनेतून ' सकाळ माध्यम समूह' आणि फिनॉलेक्स केबल यांच्यातर्फे 'साथ चल' हा उपक्रम उद्या पूलगेट पुणे येथे राबवला जाणार आहे. त्यासाठी सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम राबविणार आहे.



     ती शपथ आपल्या माहितीसाठी....

              मी संतांच्या साक्षीने शपथ घेतोकी, माझ्यासह माझ्या कुटूंबाचे, शहराचे आणि देशाचे आरोग्य सुदृढ ठेवणे, घर, आंगण व परिसर स्वच्छ ठेवणे, हे माझे नित्यकर्तव्य आहे.त्याला अनुसरुन सदैव माझी कृती राहील. सकल प्राणिमात्रांचे आरोग्य उत्तम राहील, अशी मी ग्वाही देतो. वारीच्या निमित्ताने समाज व देशाची सेवा माझ्या हातून घडो, हीच विठुरायाची चरणी प्रार्थना! पुंडलिक वरदे... हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव,तुकाराम...

             वारीमध्ये बऱ्याचवेळा शक्तिप्रदर्शनही झालेले दिसून येते. संगमवाडी पुलानजिक संभाजी भिडे यांचे धारकरी मोठया संख्येने उपस्थित होते. याचबरोबर काही वारकरी आपल्या लहान मुलांना तसेच वयोवृद्ध पालकांना घेऊन वारीत चालत होते. 

            आम्ही रथापुढे असणाऱ्या तीन नंबरच्या दिंडीत चालत आहोत. आमच्या बरोबर पुणेस्थित गोरख चव्हाण,  सौ. इंदुमती चव्हाण, प्रकाश सरोदे, कवठे वाईतील दिलीप चव्हाण, जुन्नर येथील रंगनाथ हांडे, पाडळी येथील विजय ढाणे, मुळचे करंजखोप येथील असणारे व सध्या  मुंबईतील व्यावसायिक मधुकर मुसळे, डोंबिवली येथील मनोहर अमृतकर आदि आहेत.

             एखादी गोष्ट समाजात मोठ्या प्रमाणात न्यायची असेल तर वारी हे उत्तम माध्यम आहे. आपणही चांगला संदेश समाजात नेण्यासाठी वारीसारख्या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...