मंगळवार, १ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(९३ ) २७ फेब्रुवारी

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(९३ ) २७ फेब्रुवारी

                आमचा कालचा मुक्काम सूर्यकुंड येथे होता. सुर्यकुंड येथील हनुमान मंदिरात चोवीस तास रामचरितमानसचे  अखंड पठण चालू असते. आम्ही येथून आज सकाळी लवकर निघालो. वाटेत मंडला शहराचा  महाराजपूर हा भाग लागला. येथे आम्हास पंकज ज्योतिषी यांनी ऊसाचा रस दिला. सुरुवातीस बंजार नावाची नदी लागली ती ओलांडून आपणास यावे लागते. शहराजवळ ती नर्मदेला मिळते. या संगमावर थोडा वेळ घालवून आम्ही मार्गस्थ झालो. नंतर सहस्त्रधारा हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. सहस्त्रधारा म्हणजे खडकातून आवाज करत नदी वाहत आहे.  तेथे आपणास सहस्त्र जलधारा पाहण्यास मिळतात. आज बराचसा रस्ता  एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला जंगल अशीच  परिस्थिती होती. वाटेत महाराजपूर, घागा, अहमदपुर, सूनकही ही महत्वाची गावे लागली. 







             आजचा मुक्काम साल्हेडडा या गावात आहे. आम्हाला वाटेत मौनी सरणदास खडेश्रीबाबा  दंडवत परिक्रमा घालत असताना दिसले. त्यांनी अमरकंटकपासून आपली परिक्रमा सुरु केली आहे. दिवसाला सहासात किलोमीटर एवढे अंतर ते पार करतात. त्यांची परिक्रमा किती वर्षात पूर्ण होईल हे काही सांगता येत नाही. वाटेत  सीलपुरा येथे मनरेगा रेशीम केंद्र पाहण्यात आले.

    थोडेसे मंडलाविषयी सांगितलेच पाहिजे.....

            मंडला  हे सातपुडा डोंगरात वसलेले आहे. जिल्ह्याचा विचार करता येथील ६०% टक्के लोक  गोंड जमातीचे आहेत . थोडक्यात हा आदिवासी जिल्हा आहे. मंडला हे शहर गोंड वंशाची राजधानी होती. येथे गडाचे आणि राजवाड्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत. तसा हा जिल्हा अविकसितच आहे.

           आपणास थोडक्या जागेत तुतीची लागवड करता येते.  त्यापासून रेशीम उद्योग करता येतो म्हणून या भागात रेशीम उद्योगाला प्राधान्य दिलेले आहे. आपल्या सातारा जिल्ह्याचा विचारकरता रेशीम संशोधन केंद्र वाई येथे आहे. जर कोणाला रेशीम उद्योग करावयाचा असेल तर त्या केंद्राशी  किंवा आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. थोडक्या शेतीतून उत्पन्नाचा कायमचा स्रोत मिळण्यासाठी अशा शेतीकडे वळायला हवे असे वाटते.

    राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...