!! आमची नर्मदा परिक्रमा !!( ८५ ) १९ फेब्रुवारी
आमचा कालचा मुक्काम अनुपपूर जिल्ह्यातील ड्युमरटोला येथे होता. आम्ही सकाळी लवकर निघालो. सुरुवातीचा रस्ता पायवाटेचा होता नंतर मात्र पक्की सडक लागली. सध्या सातत्याने घाटाच्या रस्त्याने जावे लागत आहे. आज आम्ही फेरीसेमर येथे रामचरण यादव यांच्या घरी थांबलो आहोत. आज वाटेत दमेडी, बिलासपूर, पडारिया, खाटी, मिरीया ही गावे लागली. आम्ही आज दुपारी राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित अन्नक्षेत्र मोंहदी येथे भोजन प्रसाद घेतला. हे अन्नक्षेत्र महाराष्ट्रातील आहेर महाराज चालवतात.
आज आम्ही अमरकंटक जंगलातून बरेचसे चाललो. सभोवताली डोंगर, टेकड्याच दिसत आहेत. हा जिल्हा पूर्णतः आदिवासीप्रणित आहे. मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिसत नाही. एका ठिकाणी तर लहान लहान मुली बांधकामावर काम करताना दिसून आल्या, हे चित्र काही बरे वाटले नाही.
या परिसरात सिंचन सुविधेचा अभाव आहे. सगळीकडे हातपंप दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी हातपंपावर मोटारी बसवल्याचे दिसून आले. विजेसाठी सोलर पॅनलचा उपयोग बहुतांशी ठिकाणी केल्याचे दिसून आले.
विजेसाठी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, थर्मल प्रोजेक्ट, विंड मिल तसेच सोलर प्रोजेक्टवर अवलंबून राहावे लागते. आपणास सोलर एनर्जी सहज मिळते. ही ऊर्जा अक्षय आहे. या अक्षय ऊर्जेचा वापर सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा