बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६२ )

 

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६२ )

        आमचा कालचा मुक्काम धुनिवाले बाबा आश्रम छिपानेर येथे होता. धुनिवाले बाबा यांना दादाजी असेही म्हणत.त्यांचा कालावधी साईबाबा समकक्ष होता. त्यांनी साईबाबांना कफनी दिली होती तर शेगांवच्या गजानन महाराजांना चिलीम, नागपूरच्या ताजुद्दीन बाबांना चटई दिली होती असे आम्हाला सेवेकरी धुमाळ यांनी सांगितले. धुनिवाले बाबा सिध्दपुरुष होते.त्यांची प्रदर्शनी खंडवा येथे आहे.








                सकाळी आम्ही जवळच असणाऱ्या दुर्गा माताजी यांना भेटलो. त्यांना लड्डू गोपालवाले माताजी म्हणूनही ओळखतात. दुर्गा माताजींच्या बरोबर सत्संग घडून आला. भक्ती जनाबाई सारखी असावी असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष पांडुरंगाने एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपात पाणी भरले. जनाबाईना कामात प्रत्यक्ष साथ दिली. त्यामुळे जनाबाई त्यांच्या भजनात व्यक्त करताना म्हणतात की, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदयबंदी  ठाणा केला, आत विठ्ठल कोंडीयला, शब्दे केली जाडाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, नुसत्या नामस्मरनाने विठ्ठल भक्ताच्या अधीन होतो.

  माताजींनी अशी काही भजने म्हणून दाखवली. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. तेथेच आम्ही बालभोग (अल्पोपहार ) घेतला. आज बराचसा रस्ता नदीकाठचा होता. दुपारी सिलकंठ येथे भोजन प्रसाद घेतला. येथेच आम्ही कपडे धुण्याचा आनंदही लुटला. थोडी विश्रांती घेऊन आम्ही चालण्यास सुरुवात केली. दुपारनंतरचा रस्ता बराचसा गव्हाच्या शेतातून गेला होता.सीहोर जिल्हा गव्हासाठी प्रसिध्द आहे. सर्वत्र गव्हाचे मोठे मोठे प्लॉट दिसत होते.काही ठिकाणी आंब्यांच्या बागा दिसून आल्या.

     आज दुपारी पक्ष्यांसाठी निवारे केलेले पहायला मिळाले. पर्यावरणात पक्षांचे स्थान महत्वाचे आहे. पक्षी जगले पाहिजेत. हे पक्षी जैविक कीड नियंत्रणाचे काम करतात. पक्ष्यांसाठी थांबे म्हणून बांधावर वृक्षारोपण करावयास हवे.आपण रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतो त्यामुळे पक्षीजीवनावर परिणाम होतो. शेती समृध्द करावयाची असेल तर पक्षी जगले पाहिजेत यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

      राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...