!! आमची नर्मदा परिक्रमा !! (२३ )
आमचा कालचा मुक्काम भरुच जिल्ह्यातील अविधा या गावात होता.मुक्कामाचा परिसर अतिशय प्रशस्त होता.सकाळी लवकर उठून ८ किलोमीटरवर असणाऱ्या जगदीश मढी येथे पोहोचलो.हा आश्रम जगदीश महाराजांनी सुरु केला आहे. येथे रोज सकाळी ९ वाजताच भोजन प्रसाद उपलब्ध असतो तसेच प्रसादाची सुविधा दिवसभर उपलब्ध असते. जगदीश मढीपासून गुमानदेव येथे येण्यासाठी कच्चा रस्ता आहे. रस्ता म्हणजे पाऊल वाटा, वाटेत बरेचश्या ओघळी, ओढे होते.
गुमानदेव छोटे शहर आहे तेथे हनुमानाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. मोठी गोशाळा आहे. याठिकाणी आपण काही वस्तू दान करु शकतो, काही ठिकाणी त्याला " माणुसकीची भिंत " असे म्हटले जाते. ज्यांना या वस्तू हव्या असतात ते घेऊन जाऊ शकतात. उदा. कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट इत्यादी.
आज गोवाली येथे मुक्कामासाठी आलो. हे अंतर गुमानदेवपासून जवळ आहे. गोवाली या गावात येण्यासाठी राज्य मार्ग १६५ ने यावे लागले. रहदारीच्या रस्त्यावर चालणे खूपच त्रासाचे आहे. मुक्कामाच्या ठिकाणी अस्ताव्यस्तपणा जास्तच जाणवत होता. परिसर सफाईपासून सदाव्रतापर्यंत सर्वच काम करण्याची संधी मिळाली. शेतीचा विचार केला तर ऊस , आंब्याचा बागा, भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात दिसून आली.
सदाव्रतामुळे सर्वच परिक्रमावासियात स्वावलंबी होण्याची क्षमता प्राप्त होते.जीवनात स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता आहे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadaparikrama #narmadamai
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा