!! आमची नर्मदा परिक्रमा !! (२६ ) ओंकारेश्वर ते कठपोर हा दक्षिण तटावरचा ६१७ किलोमीटरचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
आमचा कालचा मुक्काम भरुडी (बुलबुला कुंड )कश्यप ऋषी आश्रमात होता.येथे नीलकंठ महादेवाचे मंदिर होते. आज जास्त अंतर जायचे असल्याने सकाळी लवकर चालण्यास सुरुवात केली. वाटेत सजोद, माटीएड, मोडिया, हांसोट,कोटेश्वर अशी गावे लागली. यापैकी हांसोट हे तालुक्याचे ठिकाण आहे. या मार्गावर नर्मदेश्वर,तिलेश्वर, कोटेश्वर अशी तीर्थक्षेत्रे आहेत.
ओंकारेश्वर ते कठपोर हा दक्षिण तटावरचा ६१७ किलोमीटरचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. शेतीचा विचार करता याठिकाणी डिझेल इंजिनवर बागायत चालते. वीज पुरवठा व्यवस्था नसल्याने अशी परिस्थिती उदभवली आहे. या परिसरात भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतलेली दिसून आली.
बिर्ला ग्रुपच्यावतीने थ्री स्टार हॉटेल सारखी सुसज्ज इमारत बांधली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून हे काम झाले आहे. आपणही आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च केला पाहिजे असे मला वाटते.

राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा