बुधवार, १२ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (३३ )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (३३ ) योगानंद आश्रम



     आमचा कालचा मुक्काम  श्रीरंग अवधूत आश्रम नारेश्वर येथे होता. सुरुवातीचा रस्ता चांगला असल्याचे समजलेवरुन आम्ही लवकरच चालण्यास सुरुवात केली. सुरुवातीचा रस्ता डांबरी होता. थोड्याच वेळात नदीकाठचा रस्ता सुरु झाला. या मार्गावर बरेचसे फार्म हाऊस आढळले. गुलाब, केळीच्या बागा सर्वत्र दिसत होत्या. कधी झाडीतून, कधी शेतातून आम्ही मार्गक्रमण केले. 

          दुपारचा विसावा घ्यायचा होता, गाव मात्र सापडत नव्हते. केळीच्या बागेतून चाललो होतो. पुढच्या गावचा रस्ता दुचाकीवरून चाललेल्या गृहस्थाना विचारला. गाव दूर असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांनी आमचे गाव येथून जवळच आहे, तुम्ही आमच्या गावाला चला, आपल्या भोजन प्रसादाची व्यवस्था करतो. त्यांचे नाव होते पियुषभाई!, गावाचे नाव होते सुराशामल! याठिकाणी दुपारचे भोजन घेतले.

            मंदिर परिसरात  भरपूर  पाणी असल्याने आम्ही दुपारी कपडे धुतले,स्नान केले. थोडी विश्रांती घेऊन मालसर गावाकडे निघालो. हे अंतर ६ किलोमीटरचे असल्याने आम्ही लवकरच मालसरला पोहोचलो.या गावात प्रेमानंद आश्रम, योगानंद आश्रम, सद्गुरू आश्रम असे भरपूर आश्रम आहेत.  हे सर्वच आश्रम अगदी नदीकाठी आहेत. आम्ही सद्गुरू धाम या आश्रमात थांबलो. हा आश्रमही खूप मोठा आहे. गावकरीसुध्दा या आश्रमात राहण्याचा आग्रह करत होते.

      योगानंद आश्रम परिसरात संत माधवदाससजी तथा डोंगरेजी महाराज यांची समाधी आहे. आम्हाला डोंगरे महाराजानी वापरलेल्या वस्तू पाहण्याची संधी मिळाली.हे गावही प्रशस्त वाटले.

      एखाद्या संस्थेबद्दल जेव्हा सर्व गावकरी आदराने बोलतात तेव्हा खूप बरे वाटते.आपण ज्या संस्थेत काम करतो ते काम चांगले केले तर त्याला समाजमान्यता मिळते.आपण करत असलेले काम प्रामाणिकपणे करावे त्यातच समाजहित असते असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...