मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१९ )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१९ ) कुंभेश्वर

             आमचा कालचा मुक्काम शहेराव येथील मंदिरात होता.आज मार्गात सोंढलिया,कुंभेश्वर,कठोरा ही महत्वाची गावे लागली.आम्ही सकाळी आंघोळीसाठी ९ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभेश्वर  या नदीकाठी असणाऱ्या मंदिरात आलो.स्नान, पूजा, कपडे धुणे या सर्वच बाबी केल्या.चहापान झाल्यानंतर एक किलोमीटर असणाऱ्या मेघनाथ महादेव या मंदिरात आलो. या मंदिराचा परिसर अतिशय देखणा होता. येथे रावणानेही तपश्चर्या केली होती असे सांगितले. येथेच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. येथून हनुमंतेश्वर येथे जायचे होते.संपूर्ण मार्ग जंगलाचा होता.या मार्गावर संपूर्ण काटेरी झुडपे होती. झुडुपातून आमचा मार्ग कधी चुकला कळलेच नाही. एका ठिकाणी रस्ता पूर्णपणे चुकल्याचे लक्षात आले."नर्मदे हर " असा आवाज दिल्यानंतर दोन गुराखी भेटले. त्यांनी आम्हास रस्ता दाखवला. काटेरी झुडुपे, पाणंद रस्ते यामधून जास्त चाललो.

आपणास कुंभेश्वर मंदिराबद्दलची माहिती देणे गरजेचे वाटते.

आपणास कुंभेश्वर मंदिराबद्दलची माहिती देणे गरजेचे वाटते.

 कुंभेश्वरामंदिराबाबत माहिती......

         या ठिकाणी मार्कंडेय ऋषीनी यज्ञ केला होता , त्या यज्ञात कुंभामध्ये भगवान शंकर प्रकट झाले म्हणून कुंभेश्वर असे नामाभिधान या स्थानास प्राप्त झाले. त्याठिकाणी शनी महाराज तसेच इतर ऋषींनी देखील तपश्चर्या केल्या होत्या. तसेच गौरीशंकर महाराजांच्या शिष्यानी उपासना करुन श्री यंत्राची स्थापना केली.याठिकाणचे आणखी वेगळे महत्व आहे. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात, शनीची पीडा असते, (पणवती ) ही पीडा कमी करण्यासाठीदेखील याठिकाणी लोक भेट देत असतात.

         शेतीचा विचार केला तर काही ठिकाणी कपाशीची शेती दिसून आली.

 आजच्या दिवसाचा विचार केला तर आपण अडचणीत असतो तेव्हा कोणीतरी  आपल्या मदतीला  निश्चितच येते असे मला वाटते.

       राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८

#narmada #narmadaparikrama #narmadariver #shivaputri 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...