गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

!! श्री काळभैरवनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र विकास "ब"वर्ग दर्जा प्राप्त होण्यासाठीची फाईल मा.ना.हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री यांचेकडे सादर !!

 !! श्री काळभैरवनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र विकास "ब"वर्ग दर्जा प्राप्त होण्यासाठीची फाईल मा.ना.हसन मुश्रीफ  ग्रामविकास मंत्री यांचेकडे  सादर !!






         बुधवार दिनांक  २७ ऑक्टोबर  रोजी मा.आ.शशिकांत शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी फाईल मंत्रालयात सादर केली. यावेळी सरपंच विजयकुमार पवार,अमरशेठ पवार ,सुनिलशेठ काकडे, विकासशेठ पवार,विशाल पवार ही मुंबईस्थित मंडळी,माजी सरपंच धैर्यशील पवार, दादासाहेब काळंगे,अंजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पवार, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार, देवस्थान  ट्रस्टचे विश्वस्त प्रविण पवार ,ग्रामपंचायत सदस्य अक्षय धस्के, रजत भस्मे, शरद हणमंत पवार,विनोद पवार, अभिजित पवार, बापूसाहेब पाटील,  सोसायटीचे माजी चेअरमन हणमंत पवार, समाधान पवार, संजय गायकवाड, जालंदर पवार, निलेश शेडगे, सुभाष पवार, अविनाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी मा. शशिकांत शिंदेसाहेब यांनी श्री काळभैरव देवस्थान वर्णे (आबापुरी) या तीर्थक्षेत्राविषयी सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. हे देवस्थान सातारा जिल्ह्यातील मोठे देवस्थान असून याठिकाणी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. याठिकाणी सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील भाविक भेट देत असतात. या भाविकांना अपुऱ्या निधीमुळे सोयी सुविधा देताना अडचण निर्माण होते त्यामुळे  या तीर्थक्षेत्राला "ब" वर्ग दर्जा मिळणं गरजेचे आहे. "ब" वर्ग दर्जा प्राप्त झालेनंतर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल असेही ते म्हणाले.

        मा.ना.हसन मुश्रीफ म्हणालेकी, आ. शशिकांत शिंदे यांनी आणलेलं काम म्हणजे माझं स्वतःचेच काम असल्यासारखे आहे. त्यांनी लगेचच प्रस्तावावर कार्यवाहीचा शेरा मारला. यथावकाश "ब"वर्गाचे काम होईल.यावेळी हसन मुश्रीफ साहेबांनी आपल्या शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढले. आ.शशिकांत शिंदेसाहेब यांच्यासारखी माणसे आमच्याबरोबर असल्याचा आम्हालाअभिमान वाटतो.  वर्णे ग्रामस्थांनी साहेबांना भक्कम साथ देण्याचे आवाहनदेखील मुश्रीफ साहेबांनी केले.






       मुंबईतील सर्व निवास, भोजन आदि व्यवस्था शेठ मंडळींनी केली होती.यावेळी आम्ही सर्वजण प्रभादेवी येथील गावच्या गाळ्यावर गेलो तेथे श्री काळभैरवाचे दर्शन घेतले, विकास कामाबाबत चर्चा झाली. इतरांना आदर्श वाटावे असे आपले गाव करुया अशीच वाटचाल करुया.

       एकंदरीत कालची मुंबई भेट गावच्या विकासातील एक माईलस्टोन ठरलेली आहे.

        राजेंद्र पवार 

     ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...