!! इशांत शर्मा जन्मदिन !! (२ सप्टेंबर )
इशांत शर्मा : जन्म २ सप्टेंबर १९८८ हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत. इशांतने कसोटी , एकदिवसीय आणि टी -२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे . तो सहा फूट चार इंच उंचीचा असून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
सन २०११ मध्ये, १०० कसोटी विकेट्स घेणारा इशांत पाचवा सर्वात तरुण खेळाडू ठरला.इशांतने २००६साली इंग्लंड आणि २००६-०७ मध्ये पाकिस्तान , इंग्लंडचा दौरा केला होता . त्याने भारतासाठी तीन युवा कसोटी आणि सहा युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
इशांत शर्माची२००८ मध्ये बांगलादेश दौर्यासाठी कसोटी संघात निवड झाली होती नंतर तो दुसर्या कसोटीत आपल्या राष्ट्रीय संघासाठी खेळला.
इशांत शर्मा हा वेगवान गोलंदाज असून तो आपल्या देशाकडून अनेक सामन्यात खेळला. भारताला विजय मिळवून दिला. इशांतला भारत सरकारने २९ ऑगस्ट रोजी "अर्जुन पुरस्कार" देऊन सन्मानित केले.
१० डिसेंबर २०१६ रोजी इशांत बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंहशी विवाहबंधनात अडकला. आपल्या देशाची क्रिकेट जगतात मान उंचावनाऱ्या
इशांतला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
संकलक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा