!! भारतीय आयुर्विमा महामंडळ
स्थापना !! (१ सप्टेंबर )
१ सप्टेंबर १९५६ रोजी या एल.आय.सी. महामंडळाची स्थापना करण्यासाठी भारतीय संसदेने भारतातील विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणारे एल. आय. सी. कायदा केला होता. त्यासाठी २४५ हून अधिक खाजगी विमा कंपन्या आणि भविष्य निर्वाह सोसायटींचे विलीनीकरण करण्यात आले होते. विम्याचा प्रचार गरीब जनतेपर्यंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात करणे, निर्माण होणारा प्रचंड निधी विकासासाठी वापरणे आणि विमेदारांची गुंतवणूक सुरक्षित करणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.
आयुर्विमा महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे,
'योगक्षेम वाहम्यहम' (आपले कल्याण ही आमची जबाबदारी )असे आहे.
ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी, जीवन विमा संरक्षण देणारी भारतातील पहिली कंपनी कोलकाता येथे स्थापन झाली. तिचे प्राथमिक लक्ष्य हे युरोपियन लोक होते , त्यांनी भारतीयांना अधिक प्रीमियम आकारले होते. सुरेंद्रनाथ टागोर यांनी हिंदुस्तान विमा संस्था स्थापन केली, जी नंतर जीवन विमा महामंडळ बनली.
बॉम्बे म्युच्युअल लाइफ अॅश्युरन्स सोसायटी ही पहिली मूळ विमा प्रदाता होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापलेल्या इतर विमा कंपन्यांचा यात समावेश आहे. विम्याचा प्रत्येक कुटुंबाशी संबंध आहे. आपण जाहिरात बघतो."जिंदगीके साथ भी,जिंदगी के बाद भी". संकट कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाने जीवन विमा उतरवावा असे वाटते.
आज ६५ वर्षांनंतर एल आय सी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि आर्थिक गुंतवणूकदार आहे. सुमारे ३० कोटी वैयक्तिक पाॅलिसी आणि ११ कोटी समुह विमा योजनेत लाभार्थी आहेत.३१ लाख कोटी रुपयेची संपत्ती असा व्यापक स्वरूप आहे. एल. आय.सी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग व्हावा. प्रत्येकानेच जीवन विमाच्या माध्यमातून आपले जीवन सुरक्षित करावे असे वाटते.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा