!! समाजसेविका डॉ.राणी बंग
जन्मदिन !! (१७ ऑगस्ट
डॉ.राणी बंग ह्या डॉ.अभय बंग यांच्या सुविद्य पत्नी. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव डॉ. राणी चारी आहे. त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून, त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते.
डॉ. राणी यांनी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे पती प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाहबद्ध होऊन समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी स्त्रीरोगशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली मिळवली.
त्यांनी, आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याविषयक समस्या व त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी "कानोसा" व "गोईण" ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह "महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'गोईण' म्हणजे मैत्रीण. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींशी गप्पागोष्टी करतांना जंगलातील झाडे, त्यांचे विविध उपयोग - खाद्यपदार्थ, औषधी, सरपण, कुंपण वगैरेंबाबतची उपयुक्त व मनोरंजक माहिती मिळत गेली, त्यांनी ही संकलित केलेली आहे. कानोसाबद्द्ल थोडीसी माहिती :--
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ.राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यांमधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने त्यांचेजवळ बोलल्या आहेत.
डॉ. राणी बंग आणि डॉ.अभय बंग यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत त्यातील काही--
१)टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
२)२००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
३)२०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
डॉ.राणी बंग यांच्या कार्याला सलाम.
संकलक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Nice & unique information sir
उत्तर द्याहटवा