मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन !! (१८ ऑगस्ट )

 

!! नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन !!
  (१८ ऑगस्ट )



नेताजी सुभाषचंद्र बोस जन्म:२३ जानेवारी १८९७ मृत्यू: १८ ऑगस्ट  १९४५
     भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युध्द करण्यास उभे राहिले हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस.
     सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी दोनवेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले होते. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे आणि त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे सुभाषबाबुंचे मत होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले परिणामी सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.
       सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करु लागले त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासात टाकले. तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाने त्यांना मुक्त करुन त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. तेथून वेषांतर करुन सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली.१९४१ च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रांवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले.
" तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा!"
    असा नारा देत भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजींना हृदयापासून सलाम.  
    संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...