!!सी.डी. देशमुख भारतीय वंशाचे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर बनले!!
(११ ऑगस्ट )
चिंतामण द्वारकानाथ देशमुख जन्म: १४ जानेवारी १८९६ मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर ( १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९५० ते १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
सी.डी.देशमुख यांच्यासारखी तत्वनिष्ठ माणसं आता दुर्मिळ झाली आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
छान माहिती
उत्तर द्याहटवा