!! श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्मदिन !!(२९ जून )
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म :२९ जून १८७१ मृत्यू :१ जून १९३४ हे मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.
कोल्हटकर यांचे११वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकरांना लहानपणापासून नाटकांची आवड होती आणि वडिलांमुळे त्यांना अनेक नाटके पाहता आली. ११वी नंतर डेक्कन कॉलेज पुणे येथे गेले. पुण्यात शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. तसेच शिकत असतांनाच विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकर यांनी लिहिलेली समीक्षा विविधज्ञानविस्तारामध्ये प्रसिद्ध झाली होती. १८८७ साली कोल्हटकरांनी एल एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे आपला व्यवसाय करू लागले. १९०१ साली कोल्हटकर बुलढाणा जिल्ह्यातील
जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.
कोल्हटकर यांची काही नाटके
गुप्तमंजूषा
जन्मरहस्य
परिवर्तन
प्रेमशोधन
मतिविकार
मायाविवाह
मूकनायक
वधूपरीक्षा
वीरतनय
शिवपावित्र्य
श्रमसाफल्य
सहचारिणी
कोल्हटकर पुणे येथील दुसऱ्या कविता संमेलनाचे आणि पुणे येथे १९२७ साली भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
कोल्हटकर यांना विनम्र अभिवादन .
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी रचलेले महाराष्ट्र गीत ( " बहु असोत सुंदर संपन्न की महा।")ऐकण्यासाठी आपणास लिंक देत आहे त्याचा आनंद आपण लुटावा.
https://youtu.be/PWVSzfMdiwI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा