शुक्रवार, २८ मे, २०२१

गोवा राज्य दिन !!(३० मे )

 

   !!  गोवा राज्य दिन   !!(३० मे ) 




                  गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला 
कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७  रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.आणि गोवा हे भारतीय गणराज्यातील २५ वे राज्य ठरले.
             गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून २०१२ च्या आकडेवारीनुसार लोकसंख्या १८.२ लाख एवढी आहे. लोकसंख्येचा विचार केला तर येथे ६०% हिंदू,२८% ख्रिश्चन व राहिलेले इतर धर्मीय आहेत. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त , म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.
         गोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात. गोव्याला "कोंकण काशी "असे देखील म्हटले जाते.
पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोन जिल्हे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले . व लवकरच हा प्रदेश काबीज केला.१९ डिसेंबर  १९६१रोजी  भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.
                  निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील  प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे.
  भूतपूर्व मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यामुळे गोव्याची वेगळी ओळख देशात झाली होती. सध्या प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आहेत.
            संकलक:  राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...