!! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जन्मदिन !! (२८ मे )
विनायक दामोदर सावरकर जन्म :२८ मे १८८३:भगूर मृत्यू :२६ फेब्रुवारी १९६६ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी तसेच हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे.
खरे स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेण्यासाठी आपण अंदमान निकोबार बेटांना भेट द्यायला हवी.तेथील तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते. तेथे त्यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयदेखील आहे.त्याठिकाणी त्यांच्या जीवनावर एक तासाचा लाइव्ह प्रोग्रॅम दाखवला जातो. तेथील विमानतळाला स्वातंत्र्यवीर
सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे.अंदमान निकोबारला सहलीच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा