!! जागतिक वारसा दिन !!
(१८ एप्रिल )
आपल्या पूर्वजांनी आमच्यासाठी गुहा, मंदिरे, चर्च, स्मारके, किल्ले अशा अनेक गोष्टी ठेवल्या. त्यांच्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी आणि पुरातन गोष्टी जतन व्हाव्यात यासाठी १८एप्रिल हा `जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.UNECSOच्या नेतृत्वात १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून पाळण्यात आला.
वर्तमानात UNESCO च्या वारसा यादीत ५३ वारसा स्थळांसह इटली अग्रस्थानी आहे. त्यानंतर चीन ५२ आहे. भारतामध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित ३६ स्थळे आहेत.
जागतिक वारसा दिन (इतिहास) :
संयुक्त राष्ट्रांच्या ‘शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटने’ची (युनेस्को) स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी झाली. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे १८ एप्रिल १९८२ रोजी ‘युनेस्को’ने जगातील प्राचीन वास्तुवारसा जपण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. त्यानंतर ‘युनेस्को’ने जगातील साऱ्या देशांना दरवर्षी १८ एप्रिल हाच दिवस ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा करण्याची विनंती केली. तसा तो भारतातही साजरा केला जातो. ‘युनेस्को’ने जागतिक पातळीवर १६७ देशांमधील १०७३ स्थानांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा दिला आहे. यात जशी मंदिरे आहेत, तशी शिल्पेही आहेत. नैसर्गिक वारशातील अभयारण्ये आहेत, तशी प्राचीन संस्कृतीच्या खुणा जपणारे अवशेषही आहेत. भारतात अशी ३६ ठिकाणे आहेत. मात्र, भारतीयांनी जपावीत अशी शेकडो मंदिरे, गुंफा, चित्रे, घाट, इमारती, अरण्ये, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, गड, किल्ले, प्राचीन वाटा, शिलालेख, नाणी, तलाव, विहिरी, मूर्ती, शिल्पे, देवराया… देशभर विखुरलेली आहेत.
आपल्या कास पठाराचादेखील जागतिक वारसा स्थळात समावेश झालेला आहे.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा