सोमवार, १९ एप्रिल, २०२१

प्रशासकीय सेवा दिन !! (२१ एप्रिल )

 

!! प्रशासकीय सेवा दिन !! (२१ एप्रिल )  

  


  भारतीय प्रशासकीय सेवा ( आय.ए.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे.(आय.पी.एस. व आय.एफ. एस.) आय.ए.एस. ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या नागरी रचनेत बरीच महत्त्वाची पदे आय.ए.एस. अधिकारी सांभाळतात.
             आय.ए.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात.
   खालील काही प्रमुख पदे आय.ए.एस. 
    अधिकारी भुषवितात.
  १)आयकर अधिकारी
  २)राजदूत व परराष्ट्र सचिव
   ३)केंद्र सरकारच्या विविध खात्यातील 
       सल्लागार
   ४)जिल्हाधिकारी
   ५)निवडणूक अधिकारी
    या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते.
       राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३१५ नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० नुसार सेवकभरती
व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम आयोगामार्फत होते. महाराष्ट्रात" महाराष्ट्र लोकसेवा आयोग"१मे१९६० रोजी महाराष्ट्रदिनी
स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध सेवाकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येते.
उदा.१)राज्य सेवा परीक्षा
२)पी.एस.आय./एस. टी.आय.
३)महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक  परीक्षा
८)लिपिक टंकलेखक परीक्षा
           यातील काही परीक्षेसाठी शारीरिक क्षमता, काही परीक्षेसाठी गणित व विज्ञान हे विषय महत्वाचे आहेत.पदवीधर ही अट सर्वच परीक्षेसाठी आहे. यु.पी.एस. सी.प्रमाणेच
एम. पी.एस. सी.साठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या चाळणीतून उमेदवाराला जावे लागते.
    संकलक :  राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...