!! जागतिक वसुंधरा दिवस !!
(२२ एप्रिल )
वसुंधरा दिवस हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू वसुंधरा दिन पाळतात.२२ एप्रिल या दिवशी दिवस व रात्र समसमान असतात.
पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल १९७० रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिनाचे आयोजन केले. पहिला वसुंधरा दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून वसुंधरा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १९३ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.
दरवर्षी एक थीम घेऊन वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.२०१८ मध्ये प्लास्टिक मुक्ती तर २०१९ वन्यजीव संरक्षण हे विषय घेतले होते.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा