!! राष्ट्रसंघाची स्थापना !!
(२८ एप्रिल )
१९१४ साली सुरु झालेल्या पहिल्या महायुध्दाने जगात प्रचंड विनाश घडवून आणला. यावेळी जागतिक शांतता टिकवण्यासाठी कायम स्वरुपाची जागतिक संघटना निर्माण करण्याची निकड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी विशद केली.
युध्द समाप्तीपूर्वीच जानेवारी १९१८ मध्ये घोषित केलेल्या चौदा कलमी कार्यक्रमात
त्यांनी जागतिक संघटना प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेचा अंतर्भाव केला.अशा संघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी वुड्रो विल्सन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली.अनेक दिवस विचारविमर्श केल्यानंतर तयार केलेला अंतिम मसुदा दोस्त राष्ट्रांनी २८ एप्रिल१९१९रोजी संमत केला.
राष्ट्रसंघाचे पहिले अधिवेशन १० जानेवारी १९२० रोजी भरले. वुड्रो विल्सन यांच्या आदर्शवादाचे राष्ट्रसंघ हे बौध्दिक अपत्य होते.
वादग्रस्त समस्यांच्या निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय विचार विनिमयाला प्रोत्साहन देणे; सदस्य राष्ट्रांचे प्रादेशिक अखंडत्व आणि राजकीय स्वातंत्र्य टिकवण्याची सामूहिक जबाबदारी मान्य करणे;युध्द, गुप्त करार आणि इतर राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे ही राष्ट्रसंघाची प्रमुख उद्दीष्टे होती.
राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे होते.राष्ट्रसंघाला काही कामात यश आले पण जागतिक शांतता टिकवण्यात मात्र अपयश आले.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा