गुरुवार, १ एप्रिल, २०२१

सॅम मानेकशॉ जन्मदिन !! ( ३ एप्रिल )

 

!! सॅम मानेकशॉ जन्मदिन !! ( ३ एप्रिल )



              फील्ड मार्शल सॅम जमशेदजी मानेकशॉ  जन्म -३ एप्रिल १९१४ मृत्यू - २७ जून २००८  सॅम मानेकशॉ  म्हणूनच त्यांना सर्वजण ओळखतात. ते पायदळाचे प्रमुख  होते.१९७१च्या भारत पाकिस्तान युध्दाच्या वेळी फिल्ड मार्शलपदावर बढती मिळवणारे पाहिले सैन्य अधिकारी होत. त्यांची लष्करी कारकीर्द चार दशकांची होती. त्यांच्या कारकिर्दीत पाच युद्धे झाली. ती पुढीलप्रमाणे १) दुसरे महायुध्द( ब्रिटिश भारतीय सैन्य )
२)भारत पाकिस्तान युध्द (१९४७ )
३)भारत चीन युध्द
४) भारत पाकिस्तान युध्द
५)बांगला देश मुक्ती युध्द
          सॅम मानेकशा हे भारतीय सैन्य अकादमी ,डेहराडूनच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. दुसऱ्या महायुध्दात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना "सैन्य क्रॉस" देऊन गौरविण्यात आले.
                  १९७१ च्या भारत पाकिस्तान  युध्दाच्यावेळी पाकिस्तानविरोधी त्यांनी  कठोर भूमिका घेतल्याने बांगलादेशाची निर्मिती झाली.
सॅम मानेकशा स्वतंत्र भारताचे पहिले सैन्य अधिकारी की ज्यांना फिल्ड मार्शलचा दर्जा देण्यात आला. त्यांना  भारत सरकारने पदमभूषण व पदमविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले.सॅम मानेकशॉ यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
         संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...