गुरुवार, १ एप्रिल, २०२१

जामनगरचे क्रिकेटपटू रणजितसिंहजी स्मृतिदिन !! (२ एप्रिल )

 

!! जामनगरचे क्रिकेटपटू रणजितसिंहजी स्मृतिदिन !! (२ एप्रिल )




          रणजितसिंह विभाजी जडेजा  जन्म-१० सप्टेंबर १८७२ मृत्यू -२ एप्रिल १९३३ हे १० वे जामसाहब आणि नवानगरचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते . 'नवानगर के जाम साहब', 'कुमार रणजितसिंहजी', 'रणजी' आणि 'स्मिथ' अशी त्यांची इतर नावे आहेत. त्यांचा शासनकाळ १९०७  ते १९३३ पर्यंतचा होता. ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि फलंदाज होते, ज्यांनी भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले उत्कृष्ट  क्रिकेटपटू होते. रणजितसिंहने मूळतः संघात उजव्या हाताच्या फलंदाजाची भूमिका बजावली होती.
त्यांची गणना आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते.
            नेव्हिल कार्डसने त्याला 'द मिडसमर नाईट ड्रीम ऑफ क्रिकेट' असेही संबोधले. आपल्या फलंदाजीमुळे त्याने क्रिकेटला एक नवीन शैली दिली आणि खेळात क्रांती घडविली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयने  भारतातील विविध शहरे आणि प्रदेशांमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रिकेट मालिकेला ' रणजी ट्रॉफी ' असे नाव दिले .  जामनगरचे क्रिकेटपटू रणजितसिंहजी
यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
        संकलक:  राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...