मंगळवार, २ मार्च, २०२१

जमशेटजी टाटा जन्मदिन १८३९ !!(३मार्च)

 

!! जमशेटजी टाटा जन्मदिन १८३९ !!(३मार्च)



              जमशेटजी नुसरवानजी टाटा  यांचा जन्म ३ मार्च १८३९ तर मृत्यू १९ मे १९०४ ला झाला होता. ते एक भारतीय अग्रणी उद्योगपती होते.त्यांनी टाटा ग्रुपची स्थापना केली होती.  ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.त्यांना भारतीय उद्योगाचे पितामह असे म्हटले जाते.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु म्हणतात.
             “जेव्हा तुम्हाला कृतीतून, विचारांतून पुढाकार द्यावा लागतो - तेव्हा असे आघाडी जे जे अभिव्यक्तीच्या वातावरणास अनुकूल नसते - तेच खरे धैर्य आहे, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक आहे, आपणास पाहिजे ते कॉल करा आणि हा प्रकार आहे जमशेटजी टाटा यांनी दाखविलेल्या धैर्याने आणि दृष्टीने. आम्ही त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचा एक मोठा संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे".
                 सुरुवातीच्या काळात व्यापारी म्हणून,तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणूनही काम केले.जमशेटपूर येथे टाटा आयर्न स्टील वर्क्सची स्थापना करुन ते उद्दोग जगताचे पितामह बनले.
       चिंचपोकळी येथील दिवाळे निघालेली मिल विकत घेऊन तिचे कॉटन मिलमध्ये रूपांतर केले. नंतर नागपुरात सेंट्रल इंडिया स्पिनिंग अँड विव्हिंग मनुफॅक्चरिंग कंपनी सुरु केली.नागपुरात व्यवसाय वृध्दी चांगलीच झाली. नंतर त्यांनी एम्प्रेस मिल सुरु केली.
जमशेटजी टाटा यांच्यापुढील चार प्रमुख उद्दिष्टे-१)लोखंड व स्टील कंपनी स्थापन करणे.  
२)जागतिक दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करणे.
३) हॉटेल व्यवसाय सुरु करणे.
४)जल विद्दुत प्रकल्प सुरु करणे.
          जमशेटजी टाटा यांनी स्वदेशीचा स्वीकार केला. त्यांनी आपल्या एका मिलचे नामकरण "स्वदेशी मिल"असे केले. विदेशी वस्तूवर बहिष्कारही घातला.
        आज टाटा उद्योगसमूहातअगदी टाचणीपासूनची उत्पादने आहेत. जगभरातील ऐंशीहुन अधिक देशात टाटा उद्योग समुहाचे काम चालते. जगातील असा कोणताही खंड नाही की जेथे टाटा उद्योग समुहाचे काम चालत नाही.या उद्योग समुहाचे कार्यालय मुंबई येथे आहे.
       अशा उद्योग महर्षीला त्रिवार अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...