सोमवार, १ मार्च, २०२१

साहित्यिक प्रा. राम शेवाळकर जन्मदिन १९३१!!(२ मार्च)

 

!! साहित्यिक प्रा. राम शेवाळकर जन्मदिन १९३१!!(२ मार्च)



                   राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च१९३१ तर मृत्यू ३ मे२००९ ला झाला होता.  हे मराठी लेखक तसेच कवी होते.
               कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.
               पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
           १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.प्रा. राम शेवाळकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक : राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...