बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

!! तानाजी मालुसरे स्मृतिदिन १६७० !! (४ फेब्रुवारी )

 

!! तानाजी मालुसरे स्मृतिदिन १६७० !!                (४ फेब्रुवारी )




             तानाजी मालुसरे हे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्याकडील एक निष्टावंत सैनिक होते. जेव्हा कोंडाणा किल्ला घेण्याचा विषय निर्माण झाला. त्याचवेळी तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न होते. आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्यासाठी गड ताब्यात घेणे महत्वाचे आहे. यावेळी तानाजी मालुसरे शिवरायांना म्हणाले की," आधी लगीन कोंडण्याचं अन मग रायबाच". कोंडाणा गडावरील उदयभानू बरोबरच्या घनघोर लढाईत  तानाजी मालूसरेंना वीर मरण आले. प्रत्यक्ष गड ताब्यात आला पण एक निष्ठावंत सैनिक कामी आल्याचे महाराजांना खूप दुःख झाले. ते म्हणाले की, "गड आला पण सिंह गेला". तानाजी मालुसरे यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून  कोंडाणा गडाचे सिंहगड असे नामकरण झाले.गडावर तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे. तो येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
        तानाजी मालुसरे यांच्यावर वि. दा. सावरकर यांनी गीत लिहिले होते. त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती.हरी नारायण आपटे यांनी त्यांच्या जीवनावर "गड आला पण सिंह गेला" ही कादंबरी लिहिली. बाबुराव पेंटर यांनी "सिंहगड" नावाचा चित्रपट काढला.
   बॉलिवूड अभिनेता-निर्माता अजय देवगण यांनी"TANHAJI The unsung warrior"  या नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.तो आपण जरुर पहावा.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...