!!गाडगे महाराज जन्मदिन !!
(२३ फेब्रुवारी )
गाडगे महाराज जन्म :२३ फेब्रुवारी १८७६ मृत्यू: -२० डिसेंबर१९५६ डेबुजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगे महाराज किंवा संत गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात.
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेंदगाव गावात धोबी कुळात झाला. ते खऱ्याअर्थाने सार्वजनिक शिक्षक होते. ते सतत प्रवास करत. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. ते झाडू घेऊन एखाद्या गावात प्रवेश करत. गाव स्वच्छ करत. संध्याकाळी कीर्तन करत.त्यांना मिळालेल्या पैशातून त्यांनी धर्मशाळा, शैक्षणिक संस्था तसेच प्राण्यांसाठी निवारे बांधले.
कीर्तनाच्या माध्यमातून ते अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला चढवत. लोकांनी दारुपासून दूर राहावे यासाठी ते प्रयत्न करीत. कठोर परिश्रम, साधे जीवन जगणे आणि गरिबांची निःस्वार्थ सेवा या मार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटूंबाचा त्याग केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर गाडगेबाबांचा
प्रभाव होता. गाडगेबाबांनी डॉ.आंबेडकर यांच्या समाजसुधारणेच्या कार्यास तसेच भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यास मदत केली.
भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदान शासनाने थांबवले होते. गाडगे महाराज तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटले व लगेचच अनुदान सुरु केले. रयत शिक्षण संस्थेने कराड येथील कॉलेजला गाडगे बाबांचे नाव देऊन त्यांचे चिरंतन स्मारक उभे केले.महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबांचे
अमरावती विद्यापीठास नाव देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. संत गाडगे बाबांच्या नावाने स्व. आर.आर.पाटील (आबा) यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले.संत गाडगेबाबा मिशनच्या माध्यमातून काही आश्रमशाळा चालवल्या जातात. वर्णे गावाशेजारी ब्रह्मपुरी येथे गाडगेबाबा मिशनची आश्रमशाळा आहे. आपण तेथे भेट द्यावयास हवी.
गाडगे बाबांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा