!! शिवजयंती !! (१९ फेब्रुवारी )
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. हा उत्सव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक गावातील तरुण मंडळे वेगवेगळ्या गडकिल्ल्यावरुन ज्योत प्रज्वलित करुन आणतात. ढोल ताश्याच्या गजरात हा उत्सव साजरा करतात. या निमित्ताने तरुण एकत्र येतात.एकीची भावना वाढते व ती आपणास प्रगतीकडे नेहते.
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपणास सर्वधर्मसमभावाची शिकवण मिळते.व्यवस्थापन कौशल्याचे ज्ञान मिळते ,युद्धनीती समजते आदर्श समाज घडण्यासाठी सर्वच गुण आपणास त्यांचेकडून मिळतात. आपण शिवरायांचे गुण अंगिकारूया हाच संदेश शिवजयंतीमधून मिळतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आपण आपल्या घरीच आपल्या लाडक्या राजाचा जन्मोत्सव साजरा करुया. छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा