सोमवार, १८ जानेवारी, २०२१

!!चिं.वि. जोशी जन्मदिन !! (१९ जानेवारी )

 


!!चिं.वि. जोशी जन्मदिन !!
    (१९ जानेवारी )






चिंतामण विनायक जोशी जन्म :१९ जानेवारी १८९२ मृत्यू : २१ नोव्हेंबर १९६३ हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.
चिमणरावांचे चऱ्हाट व एरंडाचे गुऱ्हाळ
ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती होती.
त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. चिं.वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङमय असले तरी ते व्यावहारिक जीवनात  धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांची दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली.
चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये 'सरकारी पाहुणे' नावाचा चित्रपट निघाला होता.
चिं.वि.जोशींना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...