!!गिरीश कर्नाड २० जानेवारी १९९८ रोजी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित !!
जन्म : १९ मे १९३८ मृत्यू : १० जून २०१९ हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कार्नाडांच्या आई कृष्णाबाई मानकीकर या विधवा होत्या. त्यांना एक अपत्य होते. नर्स म्हणून ट्रेनींग घेत असताना त्यांची ओळख बॉम्बे मेडिकल सर्विसेस मधल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. विधवा पुनर्विवाहाच्या त्यावेळच्या पूर्वग्रहांमुळे त्यांना पाच वर्षे लग्न करता आले नाही. त्यानंतर आर्य समाजाच्या रितीनुसार त्यांनी लग्न केले. गिरीश कर्नाड हे चार पैकी तिसरे अपत्य होत.
गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
कालिदास सन्मान पुरस्कार
तन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२)
नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
पद्मभूषण (१९९२)
पद्मश्री (१९७४)
भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५)
’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)
राजोत्सव पुरस्कार
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा