!! तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जन्मदिन !!(२७ जानेवारी )
लक्ष्मणशास्त्री बालाजी जोशी जन्म : २७ जानेवारी १९०१ मृत्यू: २७ मे१९९४ हे संस्कृत तसेच वैदिक अभ्यासक, विचारवंत आणि नामवंत मराठी लेखक होते .
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सामाजिक-धार्मिक सुधारणांसाठी लढा दिला. ते महात्मा गांधींजीच्या विचाराचे पाईक होते. महात्मा गांधीजीनी सुरु केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास त्यांनी पाठिंबा दिला. त्यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल १९५५ मध्ये भारताच्या नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्सकडून साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोशाच्या २० खंडांची निर्मिती झाली. ते १९५४ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना भारत सरकारने १९७६ ला पदमभूषण तर १९९२ ला पदमविभूषण देऊन सन्मानित केले.
यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि त्यांचा फार स्नेह होता. चव्हाण साहेबांचेमुळे विश्वकोश कार्यालय वाई येथे सुरु करण्यात आले. त्यामुळे तर्कतीर्थांचे वाई येथे दीर्घकाळ वास्तव्य होते. आज त्यांच्या नावाने वाई येथे एक शाळा चालवली जाते. मला त्यांची अनेक व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
संकलक :राजेंद्र पवार
९८५०७८११७८
विनम्र अभिवादन💐
उत्तर द्याहटवा