सोमवार, २५ जानेवारी, २०२१

!! भारतीय प्रजासत्ताक दिन !! (२६ जानेवारी )

 


!! भारतीय प्रजासत्ताक दिन !!
   (२६ जानेवारी )




        भारतीय प्रजासत्ताक दिवसाला गणराज्य दिनही म्हटले जाते.भारताच्या संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी  संविधान स्वीकारले व २६ जानेवारी  १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
      प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा.
       संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...