!! भारतीय नौदल दिन !! (४ डिसेंबर )
कुठल्याही देशात सैन्य दलाला अन्यन साधारण महत्त्व असते. सैन्य दलाच्या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्या देशांना समुद्री किनारा आहे त्या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज ४ डिसेंबर भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्तीशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाचा क्रमांक सातवा आहे. त्यामुळेच आपले शत्रूराष्ट्र आपल्याला घाबरून राहतात.
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशोधन आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.
आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात सातव्या क्रमांकावर आहे.
भारतीय नौसेनेकडे एकूण ५५ युद्धनौका आणि ५८३५० सैनिक आहेत. कोरियाच्या नौदलाप्रमाणे भारतीय नौदलही २०२० पर्यंत ब्ल्यू वॉटर क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय आहे. भारताकडे ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पानबुडी, १४ पारंपारिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्र आहेत.
नौदल प्रमुखाला ऍडमिरल म्हणतात. करमबीर सिंह हे नौदलप्रमुख आहेत.ते ३१ मे २०१९ या दिवसापासून या पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. सातारा येथे सैनिक शाळा आहे. ही सैनिक शाळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी विद्यार्थी तयार करते. साताऱ्याप्रमाणे चंद्रपूर येथेही सैनिक शाळा आहे. आता सैनिक शाळेत मुलींनाही प्रवेश दिला जातो. पुणे (खडकवासला) येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. तेथे भूदल, नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील युवकांचा नौदलातील टक्का वाढावा असे वाटते.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा