शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

!! नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही. रामन जन्मदिन !! (७ नोव्हेंबर )

 


!!  नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही.
    रामन जन्मदिन !!  (७ नोव्हेंबर )






      सी. व्ही. रामन जन्म:७ नोव्हेंबर १८८८ मृत्यू:२१ नोव्हेंबर १९७०
               सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं.
             १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
      चंद्रशेखर वेंकट रामन यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...