!!चित्रपट दिग्दर्शक दिनकर द.पाटील जन्मदिन !! (६ नोव्हेंबर )
दिनकर पाटील जन्म;६ नोव्हेंबर १९१५ मृत्यू:२३ ऑक्टोबर २००५
दिनकर पाटील हे एक प्रमुख मराठी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, आणि संवाद लेखक होते.१९५० ते १९९० हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होय.या कालावधीत त्यांनी ६० हून अधिक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन, त्यांच्या पटकथा व संवाद लिहिले. मंदिर आणि घरबार यांसारख्या हिंदी चित्रपटांचेदेखील दिग्दर्शन केले. "पाटलाचे पोर" हे त्यांचे आत्मचरित्र होय.
दिनकर पाटील यांचा जन्म मराठा पाटील कुटुंबात ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जवळील बेनाडी गावात झाला . लहानपणापासूनच त्यांना मराठी स्टेज शो, मराठी नाटकं आणि सिनेमात रस होता. कोल्हापुरात शिक्षण घेतले आणि कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून साहित्यात बी.ए. केले. ते ‘द राजारामियां’ महाविद्यालयाच्या मासिकाचे संपादक होते. ते किर्लोस्कर मासिकात लेखही लिहित असत .
दिनकर पाटील यांनी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत सहाय्यक म्हणून नोकरी करून आपल्या करकीर्दीस सुरुवात केली आणि शेवटी मास्टर विनायक यांचे सहाय्यक दिग्दर्शक झाले.नंतर ते चित्रपट दिग्दर्शक झाले त्यांनी ६० हून अधिक चित्रपटासाठी पटकथा व संवाद लिहिले.समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून ते चित्रपटाकडे पाहत.
दिनकर पाटील यांनी आपल्या चित्रपटांमध्ये मराठी लावणी लोकनृत्य सादर केले ज्यामुळे त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय झाले. त्यांचा कोल्हापुरातील जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओशी जवळचा संबंध होता . तसेच कोल्हापुरात चित्रनगरी मराठी फिल्म सिटी स्थापन करण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले.
दिनकर पाटील यांनी प्रख्यात चित्रपट निर्माते आणि मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम , नारायण हरी आपटे , लता मंगेशकर , वेंकटेश माडगुळुकर, चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे इत्यादी कलाकारांशी जवळून काम केले.
दिनकर पाटील यांनी दिग्दर्शित केलेले, पटकथा संवाद लिहिलेले काही चित्रपट आपल्या माहितीसाठी.....
जय मल्हार,सांगते ऐका, बेल भंडारा, शिकलेली बायको, सुधारलेल्या बायका, बाळ माझ नवसाचं, राम राम पावण,शारदा, पाटलाचे पोर, धन्य ते संताजी धनाजी, कामापुरता मामा,कोर्टाची पायरी, जोतीबाचा नवस, शिवरायांची सून ताराराणी इत्यादी.
दिनकर पाटील यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा