शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

!! भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन (विद्यार्थी दिवस )!! (७ नोव्हेंबर )

 


!! भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन  (विद्यार्थी दिवस )!! (७ नोव्हेंबर )





           विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.यावर्षी शाळांमध्ये कोविड- १९ मुळे सर्व कार्यक्रमावर बंधने आलेली आहेत. तरीसुध्दा या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी म्हणून कारकिर्दीचे स्मरण करुया.
                    ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील  असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिल्या  इयत्तेत प्रवेश घेतला होता.  पूर्वी गव्हर्नमेंट स्कूल म्हणून ही शाळा ओळखली जात होती.येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. याच शाळेचे विद्यार्थी भारताचे महान नेते ठरले. भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी राहिले.
                  आपणही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्नशील राहूया. शिकण्यासाठी वयाचा अडसर असत नाही. चला तर आपण आजन्म विद्यार्थी बनण्याची शपथ विद्यार्थीदिनाच्या निमित्ताने घेऊया.
     संकलक: राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

२ टिप्पण्या:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...