!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा!!(१२)
आज ह.भ. प.श्री .उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे किर्तन झाले आणि पारायण सोहळ्याची समाप्ती झाली. आज त्यांनी संत जगमित्र नागामहाराज यांचा अभंग किर्तनसेवेसाठी घेतला होता.तो खालीलप्रमाणे-
कृष्ण लोणी खाया गेला।येऊनि गोपीने धरिला।१।
मायेपाशी घेऊनि आली।तेथे कृष्ण पाहती झाली।धृ।
येथे कृष्ण येथे कृष्ण।जिकडे तिकडे अवघा कृष्ण।३।
ऐसे ऐश्वर्य गे माये।जगमित्र नागा पाहुनि धाये ।४।
चरित्राविषयी थोडेसे - या पारायणाच्या निमित्ताने काही संतांचे चरित्र लोकांना माहिती नव्हते ते माहीत झाले.त्यांचे जीवनकार्य लोकांपर्यंत आले हीच या पारायणाची फलश्रुती होय.नागा महाराज हे असेच एक संत आहेत की जे लोकांना फारसे परिचित नाहीत. नागा महाराज हे ज्ञानोबाराय यांच्या समकालीन होते. ते मुळचे परळी वैजनाथ येथील होत. नागा महाराज हे काही संपन्न घरातील नव्हते. त्यांना विरोधकांनी खूप त्रास दिला. एकदा ते झोपेत असताना झोपडीच पेटवून दिली. विरोधक किंवा निंदकांनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे चित्त विचलित होत नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्व जाणवते. नागा महाराजाच्या ३५ अभंगाची नोंद आढळते. त्यांच्या जन्म, मृत्यूची नोंद कोठेही आढळत नाही.
निरुपण -- या अभंगात कृष्ण लीलांचे वर्णन आले आहे. कृष्णाला रंगेहात पकडण्याची योजना आलेली आहे. कृष्णाच्या खोडयानी गोपिका त्रस्त झालेल्या आहेत. पण कृष्ण काही सापडत नाहीत.यशोदा माताही कंटाळते,कृष्णाला पकडायचा प्रयत्न करते. मातेची दमझाक झालेली अवस्था पाहून कृष्ण स्वतःला बांधून घेतात.
एक गोपिका कृष्णाला पकडते व यशोदा मातेकडे घेऊन जाते. हाक मारताच यशोदा माता कृष्णाला घेऊन बाहेर येते. गोपिका विस्मयचकित होते. जिकडे पाहावे तिकडे कृष्णाचीच रुपे दिसतात. अशा रितीने कृष्णलीलांचे वर्णन आलेले आहे.
आजच्या किर्तनातून समाजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना नेहमीच त्रास होत असतो. म्हणून समाजहिताचे काम करणाऱ्यानी भुंकणाऱ्या कुत्र्यांची तमा बाळगायची नसते.प्रत्येकाने आपले काम करावे हाच संदेश मिळतो.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा