!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा!!(९)
आज चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन झाले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी संत निवृत्तीनाथ यांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे--
जनासी तारक विठ्ठलची एक।कैलास विवेक सनकादिकि।१।
ते रुप वोळले पंढरीस देखा।द्वैताची पै शाखा तोडीयेली।२।
उगवले बिंब अद्वैत स्वयंम।नाम हे सुलभ विठ्ठलराज।३।
निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज। गहनीराजे मज सांगितले।४।
निरुपण करताना या अभंगांमध्ये पंढरीनाथाचे वर्णन तत्वदृष्टीने केले आहे.विवेक योग्य काय अयोग्य याची निवड करतो. साधना,रुप आणि नाम या विवेकाचा उल्लेख याठिकाणी आलेला आहे.पहिल्या चरणात साधनाचा विवेक सांगितला आहे.दुसऱ्या चरणात रूपाच्या विवेकाचा उल्लेख आलेला आहे. रूपामध्ये सगुण व निर्गुण ही रुपे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचे सुंदर ऐक्य साधलेले आहे. तिसऱ्या चरणात नामाचा विवेक सांगितला आहे.परमात्मा पंढरीनाथ प्रतिबिंब नाही तर बिंब आहे.यासाठी आरस्याचे उदाहरण दिले. आरसा हे प्रतिबिंब आहे तर व्यक्ती बिंब आहे.या अभंगामध्ये विठ्ठलची एक असा उल्लेख आढळतो. एकाला एक म्हणणे हा एकाचा अपमान आहे. यासाठी बायकोचे उदाहरण दिले.पत्नीचा परिचय करुन देताना ही माझी एक किंवा एकच बायको आहे असे म्हटले तर गोंधळ उडतो.
गुरु परंपरेचा उल्लेख करताना महाराज म्हणाले की, गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु, निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु आहेत.साहित्याचा अंगाने विचार केला तर भारतीय संस्कृती महान आहे. महाराष्ट्राएवढे संत अन्य राज्यात झाले नाहीत. संतांच्या चरित्रातून मोठया प्रमाणात साहित्य निर्मिती झाली.
आयुष्यात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. गुरुच दिशा दर्शनाचे काम करतो.आपणही आयुष्यात योग्य गुरुची निवड करावी व उज्ज्वल आयुष्यासाठी मार्गक्रमण करावे असे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा