रविवार, १ डिसेंबर, २०१९

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! Rajasthan Tour (६ )

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (६ )
                 आज १ डिसेंबर, आज सकाळी लवकर  उठून  तयार  झालो.  आमच्या निवासस्थानाजवळ पूनमसिंह स्टेडियम होते. तेथे मॉर्निंग वॉकचाही आनंद आम्ही लुटला. चहापानानंतर सकाळी ९ वाजता जैसलमेर फोर्ट पाहण्यासाठी बाहेर पडलो. या किल्ल्याची निर्मिती इ. स.११५६ मध्ये रावल जैसल यांनी केली.हा किल्ला ५ कि. मी.परिसरात विस्तारलेला आहे.किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे. हा किल्ला सोनार किल्ला म्हणूनही ओळखला जातो.या किल्ल्यास सात भव्य दरवाजे आहेत. त्यांना गणेश प्रोल,सुरज प्रोल,अखय प्रोल अशी नावे आहेत.या किल्ल्याचे वैशिष्ट्य असेकी  येथे राजाबरोबर प्रजाही राहत होती.आजही याठिकाणी सामान्य लोकही  राहतात कि ज्यांचे पूर्वज राजाच्या सेवेत होते.येथे राजा राणीसाठी स्वतंत्र महाल आहेत. दोन्ही महालांची रचना पूर्णपणे वेगळी आहे. राणी महालातून बाहेरचे दिसते. परंतु बाहेरील माणसाला आतमधील काहीही दिसु शकत नाही. महालाजवळ चौक आहे. तो दसरा चौक म्हणून ओळखला जातो. तेथे सार्वजनिक कार्यक्रमाचे  सादरीकरण  केले  जात  असे. तेथील   खास  आसनावर  बसून  राजा कार्यक्रमाचा आनंद लुटत असे.
         किल्ल्यावर  राजाच्या काळात वापरात असलेल्या वस्तूंचे छान संग्रहालय आहे. या किल्ल्यावर मोगल,खिलजी, राठोड, तुघलक इत्यादिनी आक्रमण  केले परंतु कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. याला एकमेव कारण हा किल्ला वाळवंटात आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी जैन मंदिर आहे. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
           किल्ल्याच्या अगदी जवळच पटाया महाल  आहे.तो सातमजली आहे त्यामधील दोन मजले जमीनीखाली आहेत. उन्हाळ्यात खालील दोन मजल्यांचा वापर होत असे. हा महाल बाफना कुटुंबाच्या मालकीचा होता तो आता शासनाच्या ताब्यात आहे.  हा महाल बांधण्यासाठी साठ वर्षांचा कालावधी लागला.हे कुटुंब आशिया खंडातील सर्वात मोठे सावकार होते ते प्रसंगी राजांनाही आर्थिक सहकार्य करत असत.कर्ज देत असत.येथे त्याकाळात वापरात असलेल्या संसार उपयोगी  वस्तू व्यवस्थित रित्या जतन करुन ठेवल्या आहेत.उदा.पंखे,फ्रिज,कुकर, इस्त्री इत्यादी.
           महाराजा रावल घाडसिंग यांनी जैसलमेरमध्ये तलावाची निर्मिती केली. या तलावाच्या बांधकामाची पाहणी करत असताना राजकीय विरोधकांनी त्यांना ठार केले. त्यांचेच नावावरून हा तलाव घाडीसर तलाव म्हणून ओळखला जातो.
         जैसलमेर फोर्ट,जैन मंदिर,पटाया महाल,घाडीसर तलाव या सर्वच वास्तू वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सर्वच वास्तू येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असे मला वाटते.
  प्रवासवर्णन -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८









1 टिप्पणी:

  1. खुप छान प्रवास वर्णन आणि खुप खुप धन्यवाद आम्हाला ही या प्रवासात अप्रत्यक्ष रित्या सहभागी केल्या बदल.

    उत्तर द्याहटवा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...