!! मराठा बिजनेस फोरम !!
समृध्द गाव स्पर्धा राबविणार -डॉ. अविनाश पोळ
जलसंधारण स्पर्धेमुळे दुष्काळी भागात पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. स्पर्धेत भाग घेतलेली गावे पाणीदार झाली. त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून समृध्द गाव स्पर्धा राबविणार असल्याचे प्रतिपादन सातारा येथे मराठा बिजनेस फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ अविनाश पोळ यांनी केले.
सदरच्या कार्यक्रमास प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, आयुर्गामचे प्रमुख सुरेंद्र काकडे, हॉटेल व्यावसायिक हिंदुराव जगदाळे, जीवन कापले, बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे, जगदिश शिर्के, कॉम्प्युटर मीडियाचे प्रशांत कणसे यांचेसह अनेक क्षेत्रांत कार्यरत असणारे उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते.
डॉ. अविनाश पोळ म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात जीव ओतून काम करणारांची संख्या वाढली की यश निश्चित येते. टीमवर्क महत्वाचे असते. व्यक्तिपूजा वाढलीकी अपयशाची जवळीक वाढते. जपान आणि चीनसारख्या देशांनी टीमवर्कच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रगती केली. प्रत्येक माणसात काही चांगले गुण असतातच ते फक्त हेरता आले पाहिजेत. सामान्य माणसाने चिकित्सक राहायला हवे. शासनाच्या योजना समजून घ्यायला हव्यात. शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचल्या तरी फार मोठा विकास होणार आहे.
शासन आणि समाज एकत्र आल्यानंतर फार मोठे काम होऊ शकते. आम्ही या दोहोंच्यामधील दुवा म्हणूनच काम करतो.
मी पाणी फाउंडेशनच्या कामाशी कसा जोडलो गेलो, अमीरखान, सत्यजित भटकळ यांचे जलसंधारण कामातील योगदान, रतन टाटा, अझीम प्रेमजी, मुकेश अंबानी आदींचे सहकार्य, सत्यमेव जयते या कार्यक्रमास लाभलेला लोकांचा उत्तम प्रतिसाद याविषयीची माहिती डॉ. पोळ यांनी सविस्तर सांगितली.
जाखणगाव, वेळू, न्हावी बुद्रुक ही सातारा जिल्ह्यातील गावे तर सोलापूर जिल्ह्यातील पडसाळे गाव, अहमदनगर जिल्ह्यातील कणसे वाडी हे गाव कसे बदलले हेही त्यांनी सांगितले.
समृध्द गाव स्पर्धा यामध्ये गवत, जंगल, पीक पध्दतीतील बदल, सेंद्रिय कर्ब वाढविणे, पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर याबाबीवर भर असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन कापले यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र काकडे यांनी मानले.
कृषी उद्योग फक्त देशाला वाचवू शकतो.हा उद्योग टिकण्यासाठी, खेड्यातील माणसाला उर्जितावस्था येण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवा असे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा