रविवार, २२ डिसेंबर, २०१९

BAJAJ Allianz PUNE HALF MARATHON

आज २२ डिसेंबर, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , पुणे येथे ( BAJAJ Allianz PUNE HALF MARATHON) मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २१ कि. मी.१० कि. मी.५ कि. मी.३ कि. मी. अशी विविध गटात आयोजित केली होती. मी आज २१ कि. मी. (हाफ मॅरेथॉन )मध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा १:५७:३२ (एक तास सत्तावन्न मिनिटे बत्तीस सेकंदात) पूर्ण केली.


          स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ५:१५ ला संसद सदस्य मा.गिरीश बापट, सकाळ समुहाचे प्रमुख प्रतापराव पवार , पुणे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेश यांचे शुभहस्ते फ्लॅग ऑफ करुन झाला. आज माझ्या बरोबर डॉ. देवेंद्र जाधव (उपायुक्त पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र शासन), माझे भाचे श्रीकांत घोरपडे सहभागी झाले होते.
             स्पर्धेच्या प्रारंभापूर्वी पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबतची  चार मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली. स्पर्धा ठिकाणी स्पर्धकाशिवाय कोणासही प्रवेश नव्हता.स्पर्धेची व्यवस्था अतिशय उत्तम केली होती. यावेळी स्पर्धकांना मॅटचे वाटप करण्यात आले.
        स्पर्धा मार्गावर सर्वत्र स्पर्धकांचे वाद्यवृंदाचे माध्यमातून स्वागत केले जात होते. ठिकठिकाणी इनर्जी फुडची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्ट्रेचिंग घेण्यात आले. स्पर्धेची थीम "एक पाऊल आरोग्यासाठी" अशी होती.
          आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने चालले पाहिजे. स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. चला तर आपण अशा स्पर्धेत भाग घेऊया.स्वतः निरोगी राहुया. निरोगी राहण्याचा संदेश समाजात देऊया.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...