!! राजस्थान सहल !! (४ )
आज २९ नोव्हेंबर, आजचा प्रवास पुष्कर ते बिकानेर असा होता. पुष्कर ते बिकानेर हे अंतर २६५ कि. मी. चे असल्याने प्रवासात बराचसा वेळ गेला. आज अजमेर, नागोर व बिकानेर असा तीन जिल्ह्यांतून प्रवास करावा लागला.अंतर जास्त असल्याने प्रवासास सकाळी ७:१० लाच सुरुवात केली. वाटेत नागोर जिल्हा लागला.नागोर जिल्ह्यात दोन ठिकाणी गोशाळा दिसुन आल्या.वाटेत मुंडवा नावाचे सुंदर शहर लागले.मुंडवा शहरात शहीद जवानांचे लक्षवेधक स्मारक होते.या तीन जिल्ह्यातील बरीचशी जमीन सपाट होती. विशेष म्हणजे जमीनीला सर्वत्र कुंपणे दिसत होती. सर्वत्र काटेरी झुडपेच जास्त प्रमाणात दिसत होती. शेतीचे उत्पन्न फारसे दिसत नाही.काही ठिकाणी तेलबिया व बाजरीची पिके घेतली जातात.
दुपारी बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथील "करणीमाता" मंदिरात पोहोचलो. या मंदिरात सर्वत्र उंदिरांचे साम्राज्य दिसत होते. आपण जिकडे पाहू तिकडे उंदिरचउंदीर दिसत होते. भाविक उंदिरासाठी प्रसाद देत होते. येथे पारवेदेखील मोठ्या प्रमाणात दिसत होते. नंतर राष्ट्रीय महामार्ग क्र.८९ वर पलाना येथे दुपारचे भोजन घेऊन आम्ही बिकानेरकडे मार्गस्थ झालो.
बिकानेर किल्याची स्थापना राजा बिका यांनी केली. त्यांच्यामुळेच या शहराला बिकानेर असे नाव पडले.एकेकाळी हा जंगली प्रदेश होता. हा थरच्या वाळवंटाचाच एक भाग होता. जुनागढ किल्ल्याचे आग्रा किल्ल्याशी साम्य आहे. हा किल्ला दीडकिलोमीटर परिसरात बांधलेला आहे.हा किल्ला मोगल,गुजराती, राजपूत कलांचे अनोखे मिश्रण आहे. किल्ल्यावर ३७ बुरुज आहेत. लाल दगडाचे कोरीव काम आहे. हा किल्ला एकाचवेळी बांधला नसुन दहा राजानी आपापल्या काळात त्याचा विस्तार केला आहे. किल्ल्याच्या पूर्वेस व पश्चिमेस असणाऱ्या दरवाज्यांना विविध नावे आहेत. उदा. करणा प्रोल, सुरज प्रोल,चांद प्रोल,दौलत प्रोल,फतह प्रोल,तरण प्रोल,ध्रुव प्रोल इत्यादी. येथे अनेक महल आहेत .उदा. चंद्र महल, पूल महल, सरदार महल मोती महल, अनुप महल, रंग महल.अनुप महल सर्वात मोहक व सुंदर आहे.
याठिकाणी प्राचीना बिकानेर सांस्कृतिक संग्रहालय असून येथे आपणास शस्त्रास्त्रे, वस्त्रे, दैनंदिन जीवनातील वस्तू, भांडीकुंडी, फर्निचर आदि पहावयास मिळते. सध्या या राजाचे २३ वे वंशज आहेत. ते लालगढ किल्यावर राहतात. या वंशजांपैकी करण सिंह हे सलग पाच वेळा संसद सदस्य राहिले आहेत. आजही राज्याच्या राजकारणात या कुटुंबातील सदस्यांचा प्रभाव दिसुन येतो.
हा किल्ला एका राजाने बांधला नसून सलग दहा राजांनी त्याचा विस्तार केला आहे. आपल्या पूर्वजांनी हाती घेतलेले काम पुढे नेण्यासाठी वंशजानी प्रयत्न केले आहेत. पुढील पिढ्यांनी चांगले काम नेहमीच पुढे न्यायचे असते हाच संदेश या किल्ला भेटीतून मिळतो असे मला वाटते.
प्रवासवर्णन-- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

Mast enjoy kara
उत्तर द्याहटवा