!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (१ )
साताऱ्यातील साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने दिनांक २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राजस्थान सहलीचे नियोजन केले आहे. आम्ही २५ रोजी सकाळी सहलीसाठी प्रस्थान केले. सातारा मुंबई हा प्रवास बसने केला. दुपारी ४:१५ वाजता बांद्रा जयपूर एक्सप्रेसने राजस्थानकडे कुच केले. निर्धारित वेळेप्रमाणे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ट्रेन सकाळी १०:४५ वाजता जयपूर रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर पोहोचल्याबरोबर जयपूर गुलाबी शहर असल्याची जाणीव झाली. आमची निवासव्यवस्था हॉटेल रुबीमध्ये करण्यात आली होती. आम्ही दुपारी भोजनानंतर साईटसिन पाहण्यासाठी बाहेर पडलो.
जयपूर शहर सवाई मानसिंह दुसरा याने १८ नोव्हेंबर १७२७ रोजी वसवले असे सांगण्यात आले. राजा रामसिंह याने ६ फेब्रुवारी १८७६ रोजी संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला त्यामुळे हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. आता देखील दर दोन वर्षांनी सिटी पॅलेस परिसर शासनाच्यावतीने गुलाबी रंगाने रंगवला जातो. संपूर्ण शहराला ऐतिहासिक बाज आहे.
सिटी पॅलेस परिसरात वस्त्रागार आहे. वस्त्रागाराची इमारत त्रिस्तरीय पध्दतीने बांधलेली आहे. वरचा भाग पाश्चात्य शैलीचा, मधला भाग मुस्लिम शैलीचा, खालचा भाग हिंदू शैलीचा आहे. वस्त्रागारामध्ये राजा माधवसिंह प्रथम यांनी वापरलेली वस्त्रे पाहण्यात आली. माधवसिंह प्रथम हे ७ फूट उंच,४ फूट छाती, २५० किलो वजन असणारे होते. इतर राजदरबारी वस्त्रेदेखील मोठ्या प्रमाणात होती. वस्त्रागारानंतर शस्त्रविभाग पाहण्यासाठी गेलो. तेथे जुन्या काळातील तलवारी, भाले, बंदुका, शिरस्त्राने, चिलखते,लढाईच्या वेळी वापरली जाणारी वस्त्रे पाहिली.
यानंतर जंतरमंतर वेधशाळा पाहिली. अशा प्रकारच्या ५ वेधशाळा देशात आहेत परंतु जयपुरची वेधशाळा उत्तमस्तिथीत आहे. येथे दिशा, राशी, नक्षत्रे, वेळ, अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांची मॉडेल पाहिली.
आज भूगोलाच्या ज्ञानात भर पडली. ऐतिहासिक वास्तू, जुनी वस्त्रे, शस्त्रे, कलाकुसरीच्या वस्तु जतन करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे जाणवले. चला आपणही आपल्याकडील जुन्या वस्तु पुढील पिढीला पाहण्यासाठी जतन करुया हाच संदेश यातून मिळतो.
प्रवास वर्णन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

Thank you sir, This short written note is very important because after some days we forgate and in this connecton it is very imp that this short note its own value.
उत्तर द्याहटवाthanks once again.