!! सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन !!
साताऱ्यातील पहिली आयर्नमॅन (लेडी )--सुचित्रा काटे
नुकतेच गोवा येथे हाफ आयर्नमॅनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये साताऱ्यातील २० लोकांनी भाग घेतला होता. सर्वच लोकांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला ९० कि. मी.सायकलिंग,२१ ,कि. मी.धावणे व २ कि. मी.समुद्रात पोहणे निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागते. ही स्पर्धा सुचित्रा काटे यांनी वेळेत पूर्ण केल्याने त्या साताऱ्यातील पहिल्या आयर्नमॅन (लेडी) ठरल्या आहेत. त्याचा सर्वच सातारकराना अभिमान आहे.सातारा येथे हिल मॅरेथॉन सुरु करण्यात डॉ.संदीप काटे यांचा मोलाचा वाटा आहे.(Every great person behind great woman)याप्रमाणे सुचित्रा मॅडमचा देखील मॅरेथॉन आयोजन करण्यात मोठा वाटा आहे. आज सातारा रनर सिटी म्हणून ओळखला जात आहे याचे श्रेय या दाम्पत्याला निश्चितच जाते.स्पर्धा पूर्ण करणाऱ्या २० लोकांचा सत्कार सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉनच्या वतीने करण्यात आला .
आजच्या प्रॅक्टिस रनच्यावेळी प्री व पोस्ट स्ट्रेचिंग शिव यादव यांनी उत्तमरित्या घेतले.आजच्या स्पर्धा मार्गावर बऱ्याच ठिकाणी धुके पसरले होते. काही काळ सातारा शहरावर धुक्याची चादर पसरल्यासारखे भासत होते.तर काही वेळ पावसाची रिमझिमदेखील सुरु होती. रुटसपोर्टदेखील छान होता.अल्पोपहार व्यवस्था राहुल शिंदे यांनी केली होती. त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला चेअरमन संदीपभाऊ शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन आयोजनामागचा हेतु विषद केला.आजची प्रॅक्टिस रन यशस्वी करण्यासाठी डॉ. सुधीर पवार, डॉ. संतोष यादव,डॉ. निलेश थोरात, जयंत शिवदे,शरद भोसले संदीप माने, सचिन धनावडे,राजेंद्र गायकवाड, पल्लवी नाईक,अल्पना शहा, शुभांगी माने,दमयंती गीते, सौ. धनावडे यांनी परिश्रम घेतले.
आजच्या कार्यक्रमातून व्यक्तीकडे सातत्य, चिकाटी असेल तर निश्चितच यशाला गवसणी घालता येते.(Everything is possible) चला आपण आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकुन देऊया आणि यशाला गवसणी घालूया, आपले तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करुया.
शब्दांकन - राजेंद्र पवार
९८५०७८११७८