गुरुवार, ४ जुलै, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !!(१० )
       आज तरडगावहुन पालखीचे प्रस्थान सकाळी ६ वाजता असल्याने  आम्ही लवकर उठलो.निवासस्थान सोडण्यापूवी आरती झाली.





आम्ही ७.४५ लाच काळज याठिकाणी पोहोचलो. पालखीचा पहिला विसावा काळज याठिकाणी होता.काळजकरानी पालखीचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. पालखीचा दुसरा विसावा सुरवडी याठिकाणी होता. सुरवडी येथे  सौ.मंगल घाडगे (काळज ) यांनी आणलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद आम्ही घेतला.तर दुपारचा विसावा निंभोरे याठिकाणी होता.याठिकाणी थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. दुपारनंतर पालखीचा पहिला विसावा वडजल येथे तर दुसरा विसावा फरांदवाडी याठिकाणी होता.दुपारनंतर संपुर्ण मार्गावर माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी होती. वारकरी  रस्त्याने अभंग म्हणत चालले होते.विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांना दूध, पाणी,बिस्किटे, फराळाचे पदार्थांचे वाटप केले जात होते.आज संपुर्ण मार्गावर पावसाने उघडीप दिली होती. रस्त्याने चालताना  वारकरी हरिनामात दंग होते. आजचा रस्ता अगदी चांगला असल्याने चालताना कोणताही त्रास झाला नाही. जिंती नाक्यावर स्व. यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता. फलटणनगरी प्रभू रामचंद्राची नगरी म्हणून ओळखली जाते.फलटणनगरीत पालखीचा प्रवेश झाल्यानंतर फलटण नगरपरिषदेने  माऊलींचे जोरदार स्वागत केले. रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. दिंड्यावर पुष्पवृष्टी केली जात होती. फलटण येथील पालखी तळ खुप मोठा असल्याने आजचा सांगता कार्यक्रम व्यवस्थित पाहता आला.आजची फलटण येथील निवास व भोजन व्यवस्था ज्ञानदीप पतसंस्थेतील माळशिरस शाखेतील मॅनेजर नागेश बोन्द्रे यांनी केली होती. या पालखीबरोबर अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने  वासुदेव, डोंबारी,भारूड करणारे आपल्या कला दाखवत असतात.महाराष्ट्रातील या लोककला जिवंत राहण्यासाठी वारी सारख्या उपक्रमाची गरज आहे असे मला वाटते.
   शब्दांकन -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...