मंगळवार, ३० जुलै, २०१९

!! मराठा बिझनेस फोरम !!




     सोमवार दिनांक २९ जुलै रोजी सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे मराठा बिझनेस फोरमची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर होते. मराठा बिझनेस फोरम स्थापन करण्यामागील हेतू कंग्राळकर यांनी प्रथम स्पष्ट केला.बिझनेस फोरमची मुख्य थीम "एकमेका भेटूया ,व्यवसाय वाढवूया"अशी आहे.नवीन उद्योजकांची ओळख व्हावी, व्यावसायिक मार्गदर्शन, व्यवसाय विस्तार व्हावा यासाठी अनेक उद्योजक ,व्यावसायिक एकत्र आले होते.
            प्रथम सर्व व्यावसायिकानी आपण करत असलेल्या व्यवसायाबद्धलची माहिती सांगितली. व्यवसायवृद्धिसाठी एकमेकांना सहकार्य करूया. व्यवसाय करताना काही अडचणी येत असतील तर त्या एकमेकांशी शेअर करूया असेही सांगितले गेले.
       यावेळी सौ. वैभवी बाचूळकर यांनी पेस्ट कंट्रोलबाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन दिले. Pre-constructin, Post-construction मध्ये पेस्ट कंट्रोल कसे केले जाते याचे सचित्र मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणताही आजार झालेनंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच चांगला असतो.(Prevention is better than cure.) एकंदरीत उंदीर, साप किंवा अन्य उपद्रवी किटकापासून आपले संरक्षण व्हायला हवे. संरक्षणासाठी होणारा खर्च नुकसानीपेक्षा निश्चितच कमी असतो.
       यावेळी बालाजी मोबाईलचे मालक संतोष शेडगे यांना (Sakal Excellence Award)मिळालेबद्दल उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. संतोष शेडगे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपणाकडे चांगली संभाषण कला असली पाहिजे. आपणाकडे इतरांपेक्षा वेगळी थीम असली पाहिजे त्याचा प्रभाव नेहमी इतरांवर पडत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साबळे यांनी केले तर आभार मी (राजेंद्र पवार )यांनी मानले.आजच्या बैठकीसाठी सातारा शहरातील अनेक व्यावसायिक उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमातून  एकमेकांना सहकार्य करुया आणि सारेजण पुढे जाऊया हा संदेश मिळाला असे मला वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...